
छत्रपती संभाजीनगर ः किड्स प्लॅनेट स्कूलचे इंडियन आयडल या विषयावर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंजीनियरिंग सायन्स अँड ह्युमॅनिटीज हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हेड डॉ भावना पिंगळे, तसेच होल्डिंग हॅण्ड एनजीओचे प्रेसिडेंट सुरेश शिरशीकर, शाळेचे संस्थापक राजू नगरकर व प्राचार्य डॉ कांचन नगरकर तसेच संस्थेचे सचिव आशा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच किड्स प्लॅनेट स्कूलचा शिक्षक वृंद ज्योत्स्ना बिरादार, माधवी साखरे, भक्ती मुळीक, प्रेमा देशपांडे, सोनाली बनसोडे, भाग्यश्री डोळस, सना सय्यद आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. शाळेच्या प्राचार्य डॉ कांचन नगरकर यांनी शाळेचा अहवाल सादर केला.
प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय विविध उपक्रमामध्ये मिळालेले पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर गणेश वंदना करून कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केला. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संस्थापक राजू नगरकर व प्राचार्य डॉ कांचन नगरकर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. शाळेचे संस्थापक राजू नगरकर यांनी सर्वांचे आभार मानले.