
चार पदकांची कमाई
नागपूर ः भंडारा येथील वॉटर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना कॅनोइंग, कयाकिंग, ड्रॅगन बोट प्रकारात दोन रौप्य व दोन कांस्य अशी चार पदके जिंकली.
चंदीगड येथील सुखना लेक या ठिकाणी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कॅनोइंग कयाकिंग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी भंडाराच्या खेळाडूंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत ड्रॅगन बोट या प्रकारात दोन रौप्य, एक कांस्य पदक व के २ ५०० मीटर प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले. तसेच ड्रॅगन बोट महिला संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.
या शानदार कामगिरीबद्दल भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते, भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, दिशा फाऊंडेशन अध्यक्ष सरिता फुंडे, ॲकडमीचे आधारस्तंभ अभय भागवत, डॉ चोले, डॉ व्यास, डॉ मेघरे, डॉ जिभकाटे, कीर्ती बिसेन, डॉ गिऱ्हेपुंजे, संस्थापक सुभाष जमजारे, सचिव स्वप्नील करकाडे, मिलिंद भेंडारकर, प्रशिक्षक अविनाश निंबार्ते (राज्य क्रीडा मार्गदर्शक), पूजा बेंदेवार, विलास बोरकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.