
नंदुरबार ः आंतरराष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेच्या बेस कॅम्पसाठी श्रॉफ हायस्कूलच्या हिमांशू माळी, वंश त्रिवेदी, साची शिरसाट जानवी हेगडे यांची निवड करण्यात आली आहे. नैरोबी (केनिया) येथे आंतरराष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा होणार आहे.
देहरादून (उत्तराखंड) येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय रोलबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करत हिमांशू माळी, वंश त्रिवेदी, साची शिरसाठ व जानवी हेगडे यांची केनिया येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेच्या बेस कॅम्पसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
देहरादून येथे राष्ट्रीय रोलबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत केनिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेच्या बेस कॅम्पसाठी आपली निवड निश्चित केली.
रोलबॉल असोसिएशन ऑफ इंडिया व आंध्र प्रदेश असोसिएशन रोलबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कोईमत्तूर कुर्नुल याठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बेस कॅम्प २७ मार्चपर्यंत होत आहे.
या निवडीबद्दल सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड रमणलाल शाह, सचिव डॉ योगेश देसाई, मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका सीमा पाटील, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक जगदीश वंजारी, मनीष सनेर, हेमचंद्र मराठे व नंदुरबार जिल्हा रोलबॉल असोसिएशनचे सचिव तथा प्रशिक्षक नंदू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.