
नंदुरबार ः ५७वी पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा ओडिशा राज्यातील पुरी येथे ३१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या पुरुष व महिला संघांचा सहभाग निश्चित झाला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी अनिल रौंदळ यांची निवड झाली आहे.
अनिल रौंदळ हे सध्या अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा, जळखे, ता. जि. नंदुरबार येथे कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात खो-खो खेळाचा प्रसार व खेळाडू घडवण्याचे कार्य केले आहे. अनिल रौंदळ यांनी जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी महाराष्ट्र व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये संघांचे नेतृत्व केले असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना विविध स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.
अनिल रौंदळ यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल नंदुरबार जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष ॲड राम रघुवंशी, उपाध्यक्ष प्रा संजय जाधव, कार्याध्यक्ष प्रा राजेंद्र साळुंखे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सहसचिव डॉ राजेश सोनवणे, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे शासकीय परिषदेचे सदस्य प्रा मनोज परदेशी, खजिनदार विशाल सोनवणे, सहसचिव हरीश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.