
छत्रपती संभाजीनगर ः शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रस्ताव शासन दरबारी कॅबिनेटच्या मान्यतेसाठी क्रीडा विभागात असल्यामुळे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करावा अशी मागणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडा मंत्र्यांसोबत चर्चा करतो व कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे खेळाडूंच्या हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सागर मगरे यांना दिले आहे.