
हिंगोली ः राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी वसमत येथील राष्ट्रीय पंच अमोल मुटकुळे यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय खो-खो महासंघ आणि ओडिशा खो-खो असोसिएशन यांच्या वतीने ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ५७वी पुरुष व महिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन पुरी, ओडिशा येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विविध राज्यांतील खो-खो पंचांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये वसमत येथील खो-खो खेळाचे राष्ट्रीय पंच अमोल मुटकुळे यांची पंच म्हणून नियुक्ती झाली आहे.
या नियुक्तीबद्दल हिंगोली जिल्हा खोखो असोसिएशनचे अध्यक्ष आणि शिवेश्वर नागरी सहकारी बँक वसमतचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार, हिंगोली जिल्हा खो-खो संघटनेचे उपाध्यक्षा मनीषा काटकर, उपाध्यक्ष संदीप सोनी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तांत्रिक समितीचे अध्यक्ष आणि हिंगोली जिल्हा ॲम्युचर खोखो असोसिएशनचे सचिव डॉ नागनाथ गजमल, शिवाजी कट्टेकर, मीनानाथ गोमचाळे, बाळासाहेब कोसलगे, प्रवीण शेळके, प्रा. निरंजन आकार, प्रा. आनंद भट्ट, नाना शिंदे, सुरज शिंदे, मनोज टेकाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.