देवगिरी महाविद्यालयात आयोजन
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत कुस्ती स्पर्धा कर्जत येथे २६ ते ३० मार्च दरम्यान संपन्न होत आहे.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा (ग्रामीण विभाग) जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन देवगिरी महाविद्यालय येथे रविवारी (२३ मार्च) करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेचे वजने रविवारी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. कुस्ती स्पर्धेला सुरुवात सकाळी १० वाजता होईल. कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालीम संघ आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धा प्रोढ पुरुष माती व गादी कुस्ती विभागात होणाऱ आहे. पुरुष माती व गादी या निवड चाचणीत ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व महाराष्ट्र केसरी गट (८६ ते १२५ किलो) असे वजन गट आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र व इच्छुक पैलवानांनी वजनासाठी येताना २ रंगीत फोटो व आधार कार्डाची मुळ प्रत, एक झेरॉक्स प्रत आणि प्रवेश शुल्क रुपये १०० आणणे अनिवार्य आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुस्तीपटूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते तसेच जिल्हा कुस्ती तालीम संघाचे पदाधिकारी डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, हरिसिंग राजपूत, सचिव प्रा नारायणराव शिरसाठ आदींनी केले आहे.
अधिक माहितीसाठी आयोजन समितीचे प्रा सोमीनाथ बखळे (7774077161), के डी चोपडे, प्रा मंगेश डोंगरे, प्रा हरिदास मस्के, बाबासाहेब थोरात, विजयसिंग बारवाल, प्रदीप चव्हाण, देवगिरी महाविद्यालय क्रीडा विभाग प्रमुख डॉ शेखर शिरसाठ व प्रा राकेश खैरनार यांच्याशी संपर्क साधावा.