
आचल अग्रवालचे १६ धावांत पाच बळी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए महिला संघाने प्रेसिडेंट इलेव्हन संघावर सात विकेट राखून मोठा विजय मिळवला. या लढतीत आचल अग्रवाल ही सामनावीर किताबाची मानकरी ठरली.
कोळवाडी येथील मास्टर्स क्रिकेट क्लब मैदानावर हा सामना झाला. प्रेसिडेंट इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, त्यांचा डाव २७ षटकात अवघ्या ७२ धावांत गडगडला. त्यानंतर डीव्हीसीए महिला संघाने २१ षटकात तीन बाद ७५ धावा फटकावत सात विकेट राखून सहजपणे सामना जिंकला.
या सामन्यात आराध्या पवार हिने सहा चौकारांसह ३९ धावा फटकावल्या. संजीवनी पवार हिने ३७ चेंडूत ३५ धावा काढल्या. तिने पाच चौकार मारले. आचल अग्रवाल हिने तीन चौकारांसह २१ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत आचल अग्रवाल हिने अवघ्या १६ धावांत पाच विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. समिधा चौगले (२-६) व स्वंजली मुळे (२-२६) यांनी अचूक मारा करत प्रत्येकी दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः प्रेसिडेंट इलेव्हन ः २७ षटकात सर्वबाद ७२ (साक्षी कानडी १३, साक्षी वाघमोडे ५, संजीवनी पवार ३५, आचल अग्रवाल ५-१६, समिधा चौगले २-६, स्वंजली मुळे २-२६) पराभूत विरुद्ध डीव्हीसीए महिला संघ ः २१ षटकात तीन बाद ७५ (आराध्या पवार नाबाद ३९, आचल अग्रवाल नाबाद २१, शलाका काणे १-२०, गौरी अहिरे १-१५, अमिषा बामणे १-११). सामनावीर ः आचल अग्रवाल.