
नागपूर ः पीजीटीडी शारीरिक शिक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आयोजित शासकीय सीईटी परीक्षा सुरळीत पार पडली.
महाराष्ट्र सरकारची सीईटी परीक्षा फिल्ड टेस्ट फॉर एमपीएड गुरुवारी सकाळी साडेआठला सुरू झाली. पाचही इव्हेंट सीट अप्स, स्टॅंडिंग ब्रोड जंप, शटल रन, मेडिसिन बॉल थ्रो, आणि सीट अँड रीच टेस्ट, सुरळीत पार पडले. सेंटर इन्चार्ज डॉ माधवी मार्डीकर व एकूण बारा सब्जेक्ट एक्स्पर्ट, दोन ऑब्झर्व्हर्स डॉ विजय दातरकर, डॉ विशाखा जोशी, डॉ माहुरकर, पीजीटीडीचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ही परीक्षा सुरळित पार पडली. या परीक्षेत भारतातून एकूण २८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात जम्मू कश्मीर, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गोवा, अंदमान येथून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते.