
ठाणे ः ठाणे येथील एसएमएम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग उत्कर्षा हवालदार व माध्यमिक विभाग मुख्याध्यापक रोशन वाघ यांनी शाळेचे क्रीडा प्रशिक्षक प्रमोद वाघमोडे यांची महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.