गतविजेत्या केकेआर संघाचा आरसीबी संघाशी सलामीचा सामना 

  • By admin
  • March 21, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

पावसाच्या शक्यतेमुळे नाणेफेक महत्त्वाची ठरणार 

कोलकाता ः इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामात गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या सामन्याने शनिवारी प्रारंभ होणार आहे. पावसाची शक्यता असल्याने खेळपट्टी कोणाला मदत करणारी ठरते हे महत्त्वाचे ठरणार असून नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे.  

गतविजेत्या केकेआर संघ अनुभवी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. दुसरीकडे आरसीबी संघ रजत पाटीदार या युवा खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. ईडन गार्डन्स मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते. परंतु, फिरकी गोलंदाजांना खेळपट्टी अधिक अनुकूल ठरते. केकेआर संघाचे सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती हे फिरकी गोलंदाज कमालीचे यशस्वी ठरलेले आहेत. या खेळपट्टीवर सरासरी १८० धावसंख्या आहे. पावसाची शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला लक्ष्याच्या पाठलाग करणे तुलनेने सोपे जाईल. 

ईडन गार्डन्स मैदानावर २६२ धावांची धावसंख्या ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे, जी पंजाब किंग्जने केकेआर विरुद्ध केली होती. या मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या ४९ धावा आहे आणि हा अवांछित विक्रम आरसीबीच्या नावावर आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३८ सामने जिंकले आहेत आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने ५५ सामने जिंकले आहेत. आयपीएल स्पर्धेत केकेआर आणि आरसीबी संघात एकूण ३२ सामने खेळले गेले आहेत. त्यात केकेआर संघ १८ आणि आरसीबी संघ १४ सामन्यात विजय नोंदवण्यात यशस्वी ठरले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंग, लवनीथ सिसोदिया, क्विंटन डी कॉक, रहमानउल्लाह गुरबाज, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, रोवमन पॉवेल, वेंकटेश अय्यर, मोईन अली, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अँरिच नोर्टजे, स्पेन्सर जॉन्सन.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, स्वस्तिक चिकारा, देवदत्त पडिकल, जितेश शर्मा, फिलिप साल्ट, मनोज भंडागे, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, यश दयाल, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, मोहित राठी, अभिनंदन सिंग.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *