
स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेतर्फे आयोजन
मलकापूर :स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या वतीने आयोजित मलकापूर शहरात पहिल्यांदा शालेय विद्यार्थ्यांकरिता आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर एसपीएल स्टुडन्ट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मलकापूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावंत शालेय खेळाडूंचा शोध घेण्यासाठी व त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. एसपीएल टी १० क्रिकेट लीग स्पर्धेसाठी पाच संघ निवडण्यासाठी २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूर येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवड चाचणी करिता १४ वर्षांखालील म्हणजे १-१-२०११ ते ३१-१२-२०१४ पर्यंत जन्मलेले खेळाडू पात्र राहतील. सर्व खेळाडूंनी आपले क्रिकेट साहित्य, स्पोर्ट्स गणवेश,आधार कार्ड झेरॉक्ससह स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूर येथे क्रीडा शिक्षक स्वप्निल साळुंके, मानसी पांडे, मनीष भोपळे, आकाश खोडके यांच्याशी संपर्क साधावा. निवड झालेल्या खेळाडूंना एसओएस इंडियन्स, एसओएस सुपर किंग, एसओएस चॅलेंजर, एसओएस कॅपिटल्स, एसओएस टायटन्स अशा पाच संघांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एसपीएल टी १० क्रिकेट स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण व लाईव्ह स्कोअर कार्ड यूट्यूबवर दाखवण्यात येणार आहे.
या निवड चाचणीत तालुक्यातील जास्तीत जास्त शालेय खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन शाळेचे संचालक ॲड अमर कुमार संचेती व शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ सुदीप्ता सरकार यांनी केले आहे. एसपीएल टी १० क्रिकेट निवड चाचणी व स्पर्धेकरिता सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.