
पुणे : पटवर्धन बाग येथील एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात बाद पद्धतीने सुरू असलेल्या जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अनेक आश्चर्यकारक निकाल लागले.
अनुभवी कॅरम खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर अटीतटीच्या सामन्यात विजय मिळविले. स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी व मुख्य पंच अभय अटकेकर यांनी सामने चुरशीचे होत असल्याचे सांगितले.

शनिवारी (२२ मार्च) सकाळी दहा वाजता तिसऱ्या दिवशीच्या स्पर्धा सुरू होईल. उपांत्य फेरीच्या स्पर्धा होतील. त्यानंतर रविवारी (२३ मार्च) अंतिम सामने दुपारी चार वाजता होतील. तसेच पारितोषिक वितरण समारोह देखील अंतिम सामना संपन्न होताच संस्थेच्या सभागृहात प्रमुख पाहुणे बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर यांचे हस्ते संपन्न होईल, असे एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष अजित गोखले यांनी कळवले आहे.
महत्त्वाचे निकाल
पंकज कुलकर्णी विजयी विरुद्ध निस्सार शेख (२५-४, १८-१३), बाळासाहेब गायकवाड विजयी विरुद्ध सुनील शेजवलकर (१८-१५, १०-२५, २३-२२), शिरीष जोशी विजयी विरुद्ध उर्मिला शेजवलकर (२५-०, २५-०), सुरेश राजवाडे विजयी विरुद्ध अविनाश निंबरगी (२०-५, २५-०), चंद्रशेखर सकलम विजयी विरुद्ध गिरीश जोशी (१४-११, ११-२२, १३-१२), हेमंत देशपांडे विजयी विरुद्ध अजित गोखले (२१-५, १३-२८, १८-९), सुनील वाघ विजयी विरुद्ध रमेश तिवारी (२५-१, २२-७), सुधाकर चव्हाण विजयी विरुद्ध अजय पऱ्हाड (२६-१३,१३- १२), अमृत परदेशी विजयी विरुद्ध सूर्यकांत केसरकर (२२-१२, २३-७), अभय अटकेकर विजयी विरुद्ध वसंत रत्नपारखी (२०-७,१५-१३), माधव तिळगुळकर विजयी विरुद्ध आनंद दामले
(२५-४, २१-०), राजकुमार ठाकूर विजयी विरुद्ध हेमंत देशपांडे (२५-७, २५-४).