राहुल डोंगरवारच्या प्रभावी गोलंदाजीने रेशीमबाग जिमखाना संघाचा डावाने विजय

  • By admin
  • March 22, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

नागपूर ः डॉ एम एन दोराइराजन ट्रॉफीच्या पहिल्या गट लीग सामन्यात रेशीमबाग जिमखाना संघाने अनुराग क्रिकेट क्लब, कंठी संघाचा एक डाव आणि १९३ धावांनी पराभव केला.

डी वाय पाटील स्कूलच्या मैदानावर, रेशीमबाग जिमखाना संघाच्या गोलंदाजांनी अनुराग संघाला दोनदा बाद करून त्यांच्या संघाचा डावाने विजय नोंदवला. राहुल डोंगरवारने पहिल्या डावात सहा विकेट्स घेत अनुराग संघाला ११८ धावांवर बाद केले. फॉलोऑन करताना त्यांची कामगिरी आणखी वाईट झाली आणि त्यांना फक्त २० षटकांत ८८ धावांवर बाद करण्यात आले. डोंगरवारने दुसऱ्या डावात १० धावांत दोन बळी घेतले. आदित्य खिलोटे याने १९ धावांत तीन विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक ः रेशीमबाग जिमखाना ः पहिला डाव ९० षटकांत सात बाद ३९९ (सिद्धार्थ येल्तीवार ११०, श्री चौधरी नाबाद १००).

अनुराग क्रिकेट क्लब ः पहिला डाव ३५ षटकांत सर्वबाद ११८ (राहुल डोंगरवार ५-३१).

अनुराग क्रिकेट क्लब ः दुसरा डाव (फॉलोऑन) २० षटकांत सर्वबाद ८८ (आदित्य खिलोटे ३-१९, राहुल डोंगरवार २-१०).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *