
धाराशिव : भारतीय धनुर्विद्या महासंघाच्या अधिपत्याखाली आंध्र प्रदेश धनुर्विद्या संघटनेच्या वतीने गुंटूर येथे होत असलेल्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे धनुर्धर मल्हारराजे काकडे, स्वराज जाधव आणि आर्यन खरड यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून १० वर्ष वयोगटात कंपाउंड राउंड प्रकारात मल्हारराजे काकडे व स्वराज जाधव यांची तर कंपाउंड राउंड प्रकारातूनच १३ वर्ष वयोगटात आर्यन खरड यांची निवड झाली आहे.
या खेळाडूंना धाराशिव जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, प्रशिक्षक कैलास लांडगे व आदित्य काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे डाएट कॉलेज येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करत आहेत.