
मुंबई ः गोवा येथे झालेल्या ४७व्या योनेक्स सनराइज मास्टर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या पूजा खांडेकर व स्वप्नल चक्रवर्ती यांनी दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत पूजा खांडेकर व स्वप्नल चक्रवर्ती या जोडीने अंतिम सामन्यात दीपा प्रियंगत (कर्नाटक) व निशा जयनंदन (केरळ) या जोडीचा अटीतटीच्या सामन्यात २१-१९, १३-२१, २१-१५ असे पराभूत करुन विजेतेपद संपादन केले. पूजा व स्वप्नल या जोडीने उपांत्य फेरीत मधुस्मिता डेका (आसाम) व बिदिशा बरुआ (कर्नाटक) या जोडीचा २१-१६, २१-१८ असा पराभव करुन अंतिम फेरी गाठली होती. पूजा खांडेकर हिला प्रारंभी मिलिंद पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या पूजा खांडेकर व स्वप्नल चक्रवर्ती या दोघी अमित खडगी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.