
जळगाव ः लोणावळा येथे ११ एप्रिल पासून राज्यस्तरीय आंतर जिल्हा २० वर्ष वयोगटातील मुलांचे फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्हा संघ प्रतिनिधित्व करणार आहे. जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव फारूक शेख, कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे यांनी केले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील २० वर्षातील मुलांची फुटबॉल निवड चाचणी २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहे. खेळाडूंनी आपल्या जन्म प्रमाणपत्र सह सीआरएस नोंदणी क्रमांक व कीटसह उपस्थित रहावे.
या निवड चाचणीत तेच खेळाडू सहभागी होऊ शकतील ज्यांची सीआरएस मध्ये नोंदणी झालेली आहे. सीआरएस नोंदणीचे कार्य फुटबॉल संघटनेतर्फे दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत स्पोर्ट्स हाऊस, नूतन मराठा कॉलेज शॉपिंग कॉम्प्लेक्स, जळगाव येथे सुरू आहे.
सीआरएस नोंदणीसाठी मूळ जन्म प्रमाणपत्र पीडीएफ, मूळ आधार कार्ड पीडीएफ, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, तीनशे रुपये नोंदणी व इतर खर्च आदी गोष्टी लागणार आहेत. यासाठी राहील अहमद (९०२८६२०८२७), हिमाली बोरोले (७३८५६६२४०१), वसीम शेख (९७६५१२०५२९), मोइस चार्लीस (७३८५३३३९२१), तौसिफ शेख (९९६०३५६७७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.