
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक करंडक टी २० क्रिकेट स्पर्धेचा महामुकाबला यजमान मासिया अ आणि डीबीए या संघांमध्ये रविवारी (२३ मार्च) रंगणार आहे.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना प्रकाशझोतात खेळवण्यात येणार आहे. उपांत्य सामन्यात मास्सिया अ संघाने १० धावांनी रोमांचक विजय नोंदवला तर डीबीए संघाने आठ विकेटने विजय साकारला. दोन्ही संघांची स्पर्धेतील एकूण कामगिरी लक्षवेधक ठरली आहे. त्यामुळे या दोन्ही संघातील विजेतेपदाचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
डीबीए संघ ः मोहित घाणेकर (कर्णधार), दिनकर काळे, मुकुल जाजू, संजय डोंगरे, ओंकार पाटील, देवा नांदेडकर, अनंता बडदे, संदीप देगांवकर, रिझवान शेख, सत्यजित वकील, सुनील भोसले, अजय शितोळे, सुरज मुरमुडे, गौरव शिंदे, हरमीतसिंग रागी.
मास्सिया अ संघ ः मधुर पटेल (कर्णधार), रोहन राठोड, मंगेश निटूरकर, मनीष अग्रवाल, हितेश पटेल, रोहन शाह, धर्मेंद्र पटेल, कृष्णा पवार, दत्ता बोरडे, मनीष करवा, अब्दुल वाजेद शेख, मिलिंद कुलकर्णी, शुभम मोहिते, मुकीम शेख, रुद्राक्ष बोडके.