
नागपूर ः श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालय येथे महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी संपन्न झाली.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर येथील योग आणि स्वस्थ वृत्त आणि योग विभाग प्रमुख डॉ सुमिता जैन यांच्या नेतृत्वात डॉ मुनमुन प्रताप, डॉ तुषार मोरे, डॉ वर्षा करिअप्पा, डॉ वैष्णवी साबळकर, डॉ मनीषा कावरखे या वैद्यकीय अधिकारी यांनी एकूण २४८ विद्यार्थ्यांची चाचणी करून सुदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. हे शिबीर प्राचार्या डॉ प्रिया वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले तर क्रीडा विभाग प्रमुख डॉ संजय खळतकर यांचे सहकार्य लाभले.