
छत्रपती संभाजीनगर ः महेंद्राज् लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमीतर्फे आयोजित पाच दिवसीय मोफत योग आणि स्व-संरक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र प्रियदर्शनी कॉलनी यांच्यावतीने महिला दिनानिमित्त पाच दिवसीय योग व स्व-संरक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महेंद्राज् लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमीचे संचालक महेंद्र रंगारी यांनी प्रशिक्षण दिले. तसेच तेजल ठाकूर, जयंत पाटील यांनी देखील प्रशिक्षण दिले. या दोन्ही शिबिराचे उदघाट्न प्रमुख अतिथी महेंद्राज् लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकॅडमीचे संचालक महेंद्र रंगारी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा तेजल ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या पाच दिवशीय शिबिरात माहिला वर्गाने अतिशय उत्साहितपणे चांगली उपस्थिती ठेवत चांगला सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन संचालक सुवर्णा कुलकर्णी यांनी केले होते.
या शिबिराचा समारोप नुकताच झाला. यावेळी महिलांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अकॅडमीला सतत सहकार्य केल्यामुळे योग शिक्षिका तेजल ठाकूर, योग शिक्षक जयंत पाटील, क्रीडा शिक्षिका पूजा पांडे, केंद्र संचालिका सुवर्णा कुलकर्णी यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या शिबिरासाठी महेंद्र रंगारी यांना डॉ विवेक चर्जन, डॉ मनीषा चर्जन, महेश पूर्णपात्रे, बाळकृष्ण खानवेलकर, संजय जगताप, डॉ मीनाक्षी मुलीया, डॉ शत्रुंजय कोटे, डॉ मकरंद जोशी, डॉ सागर कुलकर्णी, डॉ अर्चना गिरी, प्रा मुकुंद कुलथे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.