
जुबेर शेख, सादिया मुल्ला, सृष्टी काळे यांची कर्णधारपदी निवड
सोलापूर ः इचलकरंजी येथे होणाऱ्या भाई नेरुरकर करंडक राज्य खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पुरुष, महिला व किशोरी हे तीन संघ रविवारी रवाना झाले. या संघाच्या कर्णधारपदी जुबेर शेख (उत्कर्ष क्रीडा मंडळ), सादिया मुल्ला (किरण स्पोर्टस्) व सृष्टी काळे (न्यू सोलापूर क्लब) यांची निवड सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव ए बी संगवे यांनी जाहीर केली.
तिन्ही संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा संघाचे सराव शिबीर हरीभाई देवकरण प्रशाला व वसुंधरा महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. या शिबिराचा समारोप स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे यांच्या हस्ते झाला.
यावेळी वसुंधरा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक अशोक पाटील, असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, राजाराम शितोळे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, पंच मंडळ सचिव गोकुळ कांबळे, शरद व्हनकडे, अजित शिंदे, सोनाली केत, भाजपचे शहर क्रीडा प्रकोष्ठ यशवंत पाथरूट, न्यू सोलापूर क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार, उपाध्यक्ष संतोष कदम, सचिव प्रथमेश हिरापुरे, आनंद जगताप आदी उपस्थित होते. किशोरी गटाचे कीट युजे कन्स्ट्रो सोल्युशनचे जवाहर उपासे यांनी पुरस्कृत केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण कोळी यांनी केले.
सोलापूर पुरुष संघ
जुबेर शेख (कर्णधार), विजय संगटे, जाफर शेख (न्यू सोलापूर), सौरभ चव्हाण, राकेश राठोड, समर्थ कोळी, अक्षय इंगळे, रोहन राजपूत (किरण स्पोर्टस), अजित रणदिवे, गणेश बोरकर, अजय कश्यप, कृष्णा बनसोडे (अर्धनारी नटेश्वर वेळापूर), तुषार चव्हाण (फ्लाईंग स्पोर्टस्, पंढरपूर), आकाश हजारे, अमोल केदार (शिवप्रतिष्ठान, मंगळवेढा). उमाकांत गायकवाड (प्रशिक्षक) अजित शिंदे (व्यवस्थापक).
सोलापूर महिला संघ
सादिया मुल्ला (कर्णधार), सृष्टी रुपनर, गौरी काशविद, सपना बंडे, साक्षी व्हनमाने, अर्चना व्हनमाने, आरती खरात, सृष्टी नारायणी, मयुरी स्वामी, (किरण स्पोर्टस्), स्नेहा लामकाने, कल्याणी लामकाने, समृद्धी सुरवसे, साक्षी देठे, श्रुती कस्तुरे (केके स्पोर्ट्स वाडीकुरोली), अक्षता प्रचंडे (समृद्धी स्पोर्टस्), मोहन रजपूत (प्रशिक्षक), अमृता स्वामी (व्यवस्थापिका).
सोलापूर किशोरी संघ
सृष्टी काळे (कर्णधार), आसावरी जाधव, संस्कृती बिसले (न्यू सोलापूर), ऋतुजा सुरवसे, कार्तिकी यलमार, श्रेया यलमार, संध्या घाडगे, भक्ती चौधरी (वाडीकुरोली), अक्षता गंगोडा, सृष्टी हडपद, पवित्रा नागलगाव (समृद्धी स्पोर्ट्स), खुशी पवार, मालन राठोड (किरण स्पोर्ट्स), ज्योती बन्ने (कणबस), रिया चव्हाण(उत्कर्ष), संतोष कदम (प्रशिक्षक), सोनाली केत (व्यवस्थापिका).