
सेरेना म्हसकर, आर्यन पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा
परभणी ः अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने २७ ते ३० मार्च या कालावधीत होणाऱ्या ३४व्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. मुंबई उपनगराच्या सेरेना म्हसकर आणि परभणीच्या आर्यन पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.
बिहार, गया येथील जी डी गोयंका पब्लिक स्कूल, रसलपूर येथे मॅटवर ही स्पर्धा होणार आहे. मनमाड येथे झालेल्या किशोर व किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला आहे. संध्या महाराष्ट्राचे दोन्ही संघ मनमाड येथे सराव करीत आहेत.

महाराष्ट्राचा किशोरी संघ
सेरेना म्हसकर (कर्णधार, मुंबई उपनगर पूर्व), यशश्री इंगोले (परभणी), बिदिशा सोनार (नाशिक शहर), समृद्धी लांडगे (पिंपरी चिंचवड), प्रतीक्षा राठोड (परभणी), सानिका पाटील (सांगली), सेजल काकडे (नाशिक ग्रामीण), तनुजा ढेरंगे (नाशिक शहर), नंदा नागवे (जालना), आर्या लवार्डे (पुणे शहर), सिद्धी लांडे (पिंपरी चिंचवड), ईशा दारोळे (नाशिक शहर). प्रशिक्षक : शरद पाटील, व्यवस्थापिका : क्षिप्रा पैठणकर.
महाराष्ट्राचा किशोर संघ
आर्यन पवार (कर्णधार, परभणी), तुकाराम दिवटे (उपकर्णधार, जालना), सारंग उंडे (नंदुरबार), मनीष काळजे (पिंपरी चिंचवड), किशोर जगताप (परभणी), विश्वजित सुपेकर (धाराशिव), ऋतुराज महानवर (पिंपरी चिंचवड), श्रेयस लाले (रत्नागिरी), निखिल गायकर (ठाणे ग्रामीण), समर्थ ठोंबरे (कोल्हापूर), सुयोग सोनवणे (जळगाव), किरण कोळी (पुणे शहर).