
२६, २७ एप्रिल रोजी आयोजन
नाशिक ः नाशिक अॅथलेटिक्स फाउंडेशनतर्फे २६ व २७ एप्रिल रोजी तिसरी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव मंगेश राऊत, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन रामदास मुखेकर व नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ मुस्तफा टोपीवाला यांनी दिली.
नाशिक शहरातील महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत रनिंग, जम्पिंग, थ्रोविंग या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. ही स्पर्धा ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व विकासाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत ६ ते १८ वयोगटातील मुले व मुली व खुला गट यांचा समावेश असतो असे सचिव मंगेश राऊत यांनी सांगितले.
या स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन रामदास मुखेकर व नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ मुस्तफा टोपीवाला व सचिव मंगेश राऊत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 8600077828, 9545601619, 9850614660, 9284663622, 8999887427, 8668437077, 8308439645, 93715 03100 या क्रमांकावर संपर्क साधावा असे सचिव मंगेश राऊत यांनी सांगितले.
No
Hii
No