
चेन्नई ः आयपीएलच्या नव्या हंगामात पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा याने एक अवांछित विक्रम नोंदवला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या सामन्यात रोहित पहिल्याच षटकात शून्य धावांवर बाद झाला.
मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला धावांचे खाते उघडता आले नाही. त्याने आपल्या नावावर एक अवांछित विक्रम नोंदवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात रोहितने आपली विकेट गमावली. खलील अहमदच्या गोलंदाजीवर शिवम दुबे याने त्याला झेलबाद केले. यासह, रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा संयुक्त पहिला फलंदाज बनला. आयपीएलच्या इतिहासात तो १८ वेळा खाते न उघडता बाद झाला आहे. या बाबतीत त्याने ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये १८ वेळा शून्यावर बाद होण्याचा अवांछित विक्रम या दोघांच्याही नावावर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज
रोहित शर्मा ः १८
ग्लेन मॅक्सवेल ः १८
दिनेश कार्तिक ः १८
पियुष चावला ः १६
सुनील नरेन ः १६