
डेरवण युथ गेम्स
छत्रपती संभाजीनगर ः रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे झालेल्या डेरवण युथ गेम्स स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या राजश्री शाहू विद्यालय (रांजणगाव) खो-खो संघाने उपविजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत राज्यातील एकूण २४ संघ सहभागी झाले होते. राजश्री शाहू विद्यालय संघ उपविजेता ठरला. या संघाला १५ हजार रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेत कार्तिक साळुंखे हा उत्कृष्ट आक्रमक खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला.
या संघात आयुष भंगाळे, शुभम पोले, आदित्य शिंदे, रितेश जगताप, कार्तिक साळुंखे, आदित्य, गणेश पुयड, समर्थ बावणे, निखिल तारू, सौरभ भाले, श्रीकांत दवंगे, सार्थक साळुंखे, अविनाश जोलवाल या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला प्रमोद गुंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
राजश्री शाहू विद्यालय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सवाई व संचालक विकास सवाई व मुख्याध्यापक अशोक चेदे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष समीर मुळे, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार गोविंद शर्मा आणि छत्रपती संभानजीनगर जिल्हा संघटनेचे सचिव विकास सूर्यवंशी, ऋषिकेश जैस्वाल, अभयकुमार नंदन, विनायक राऊत, श्रीपाद लोहकरे, उमेश साबळे, आकाश खोजे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.