
धुळे ः संडे ऑन सायकल रॅली फिट इंडिया फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला.
फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया, फिट इंडिया, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतभर एकाच दिवशी एकाच वेळेस राष्ट्रव्यापी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा बहुमान महाराष्ट्रात धुळे जिल्ह्याला मिळाला होता.
हा उपक्रम फिट इंडिया चळवळीचा एक भाग आहे. ज्याचा उद्देश देशभरात तंदुरुस्ती, टिकाऊपणा, ओबेसिटी कमी करणे आणि सक्रिय जीवन शैलीचा प्रचार करणे आहे. सायकल रॅलीला धुळे जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक किशोर काळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ संजय पाटील, ओंकार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रवींद्र निकम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संडे ऑन सायकल उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
संडे ऑन सायकल रॅलीत धुळे जिल्ह्यातील विविध नामवंत डॉक्टर्स, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संडे ऑन सायकल रॅलीत धुळे शहरातून १२०० सायकलपटूंनी सहभाग नोंदविला. धुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकारी यांनी सायकल रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच सायकल रॅलीत धुळे सायकलिस्ट, सायक्लो ग्रीन सायकल क्लब, फनी रायडर्स यांनी विशेष सहभाग नोंदविला.
धुळे जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटना, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संडे ऑन सायकल रॅलीचे आयोजन डॉ भालचंद्र मोरे, महाराष्ट्र फिजिकल एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ बलवंत सिंग, महाराष्ट्र शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ आनंद पवार, डॉ भूपेंद्र मालपुरे, डॉ विजय पाटील, एम के पाटील, डॉ निसार हुसेन, राजेंद्र बारे, निखिल मोरे, वरुण त्यागी, रोहित निकम यांनी या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित गोराणे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला प्रकाश पाटील, प्रवीण कुलकर्णी, मोहनीश साने, गिरीश पाठक, यश मासुळे, विशाल गवळी यांचे सहकार्य लाभले.