मयुरी गायके क्रिकेट एनआयएस सर्टिफिकेट कोर्स परीक्षेत उत्तीर्ण

  • By admin
  • March 24, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सतर्फे सिक्स विक सर्टिफिकेट कोर्स डिसेंबर २०२४ – जानेवारी २०२५ दरम्यान पतियाळा (पंजाब) येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत देशातून एकूण ३५० प्रशिक्षकांनी क्रिकेट कोचिंग सर्टिफिकेट कोर्ससाठी सहभाग नोंदविला होता. यात मयुरी गायके ही क्रिकेट एनआयएस सर्टिफिकेट कोर्स परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. 

मयुरी गायके ही पतियाळा या ठिकाणी असलेले भारतीय प्रशिक्षक पल्लवदास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एनआयएस सर्टिफिकेट कोर्स परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची क्रिकेट राष्ट्रीय खेळाडू मयुरी गायके हिने यापूर्वी नांदेड, उदयपूर (राजस्थान), रेवा (मध्य प्रदेश) या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे महिला संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मराठवाडा सांस्कृतिक मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मकरंद जोशी, प्रो शत्रुंजय कोटे, डॉ रफिक सिद्दीकी, डॉ अर्चना गिरी, डॉ सागर कुलकर्णी आदींनी मयुरीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *