
आचल अग्रवाल सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय ट्रॉफी लीग स्पर्धेत डीव्हीसीए महिला संघाने सांगली महिला संघावर चार विकेट राखून विजय नोंदवला. या सामन्यात आचल अग्रवाल हिने सामनावीर किताब संपादन केला.
पीकेएस विस्डम क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना झाला. सांगली महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४१.१ षटकात सर्वबाद २०४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. डीव्हीसीए महिला संघाने ४१.४ षटकात सहा बाद २०५ धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात कृषी ठक्कर हिने १०३ चेंडूत ९३ धावांची शानदार खेळी केली. तिने १५ चौकार मारले. आचल अग्रवाल हिने पाच चौकारांसह ५८ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. महेक मुल्ला हिने ३८ धावांचे योगदान देताना चार चौकार मारले. गोलंदाजीत संस्कृती राठोड हिने ४३ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. आचल अग्रवाल हिने ३६ धावांत तीन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली. समिधा चौगले हिने २४ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः सांगली महिला संघ ः ४१.१ षटकात सर्वबाद २०४ (कृषी ठक्कर ९३, भक्ती मिरजकर ८, वैष्णवी शिंदे २०, रितू जामदार १४, सोनल शिंदे १८, संस्कृत राठोड ८, इतर ३३, आचल अग्रवाल ३-३६, स्वंजली मुळे २-६८, समिधा चौगले २-२४, आराध्या पवार १-१५, प्रणवी गाढवे १-१०) पराभूत विरुद्ध डीव्हीसीए महिला संघ ः ४१.४ षटकात सहा बाद २०५ (अद्विका जाधव ३५, राशी व्यास ७, महेक मुल्ला ३८, आचल अग्रवाल नाबाद ५८, आर्या जांभुळकर २८, रिया भोपटे नाबाद ६, इतर २६, संस्कृती राठोड ४-४३, भावी पुनमिया १-४८). सामनावीर ः आचल अग्रवाल.