
शलाका काणे सामनावीर
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय लीग स्पर्धेत नाशिक महिला संघाने प्रेसिडेंट इलेव्हन महिला संघाचा चुरशीच्या सामन्यात दोन विकेट राखून पराभव केला. या सामन्यात शलाका काणे हिने सामनावीर किताब संपादन केला.
किंग्ज स्पोर्ट्स क्लब हडपसर मैदानावर हा सामना झाला. प्रेसिडेंट महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकात सर्वबाद १७० धावसंख्या उभारली. नाशिक महिला संघाने ४३ षटकात आठ बाद १७३ धावा फटकावत दोन विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात साक्षी वाघमोडे हिने ८५ चेंडूत ६५ धावांची वेगवान खेळी केली. तिने आठ चौकार मारले. तेजस्विनी बटवाल हिने पाच चौकारांसह ३४ धावा फटकावल्या. शाल्मली क्षत्रिय हिने ३३ धावा काढताना चार चौकार मारले. गोलंदाजीत गौरी अहिरे हिने २७ धावांत तीन विकेट घेतल्या. शलाका काणे हिने ३७ धावांत तीन गडी टिपले. रसिका शिंदे हिने ३० धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः प्रेसिडेंट महिला संघ ः ४९.४ षटकात सर्वबाद १७० (साक्षी कानडी ६, अनुश्री २५, सानिया गावडे १६, साक्षी वाघमोडे नाबाद ६५, शलाका काणे २७, रसिका शिंदे २-३०, पूजा वाघ २-२३, लक्ष्मी यादव १-२१, ऐश्वर्या वाघ १-२९) पराभूत विरुद्ध नाशिक महिला संघ ः ४३ षटकात आठ बाद १७३ (तेजस्विनी बटवाल ३४, शाल्मली क्षत्रिय ३३, प्रियंका घोडके २७, कार्तिकी गायकवाड ३१, अनुष्का सोनवणे नाबाद १४, ऐश्वर्या वाघ नाबाद ५, इतर २८, शलाका काणे ३-३७, गौरी अहिरे ३-२७, भक्ती पाटील २-३५). सामनावीर ः शलाका काणे.