
चेअरमन तरंग जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः व्हेरॉक ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांच्या ६३व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन हेड लिगल अजय शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्तदान संकलनाचे कार्य दत्ताजी भाले आणि श्री सत्यसाई रक्तपिढीने केले. या शिबिरात ४१४ दात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात सर्व कर्मचाऱयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी व्हेरॉक ग्रुपचे मच्छिंद्र जाधव, विकास मगर, नंदकुमार शिंदे, गणेश तांबे, योगेश बोराडे, संतोष गवळी, विक्रम थेटे, महेंद्र पुजारी, संजय शर्मा, सुनील पोकळघट आदींनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान असूनही अनेकांना रक्तदानाचे महत्त्व अजून कळत नाही. रक्त मिळाल्याने दुसऱयाचा जीव वाचतोच पण स्वतःच्या आरोग्यालाही रक्तदान केल्यामुळे फायदा मिळतो असे सांगत अजय शर्मा यांनी चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.