
विशाखापट्टणम ः आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स संघावर शेवटच्या षटकात विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेल आनंदी होता. विजयानंतर अक्षर पटेल म्हणाला की, माझी निर्णय घेण्याची प्रक्रिया अशीच आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. माझ्या नेतृत्वाखाली हेच घडेल, म्हणून ही सवय लावून घ्या.
अक्षर पटेल म्हणाला की, ‘माझी निर्णय घेण्याची प्रक्रिया अशीच आहे, त्यामुळे काहीही होऊ शकते.’ कधीकधी चाहते रागावतील देखील. आता आपण जिंकलो आहोत, म्हणून कोणीही काहीही बोलणार नाही. अक्षर म्हणाला, ‘आम्ही आयपीएलमध्ये खूप काही पाहिले आहे. पॉवर प्लेमध्ये चार विकेट गमावणे आणि नंतर सामना जिंकणे हे फारसे पाहिले गेले नाही. पण आता क्रिकेट बदलत आहे. म्हणून तुम्हाला फक्त क्रीजवर राहून प्रयत्न करावे लागतील.
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘आम्ही चांगली धावसंख्या उभारली होती. आम्ही या पराभवातून शिकू आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. चूक कुठे झाली हे सांगणे सोपे आहे. त्यांच्याकडून ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष यांनी शानदार फलंदाजी केली. आणखी एक खेळाडू, विप्राज निगम यांनी मिळून सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. दिल्ली कॅपिटल्सच्या आशुतोष शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याने ३१ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.