
बेल्ट परीक्षेतील उत्तीर्ण खेळाडूंना बेल्टचे वितरण
पुणे ः देसाई ज्युदो सेंटरच्या मल्टिफिट बाणेर ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील ज्युदो खेळाडूंना ज्यूदो बेल्टचे वितरण व माजी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे सचिव शैलेश टिळक, तांत्रिक सचिव दत्ता आफळे, नगरसेवक अमोल बालवडकर, डॉ. संतोष तेली, पुणे जिल्हा ज्युदो असोसिएशनचे योगेश धाडवे, तुषार सांगळे यांच्या हस्ते खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
खेळाडूंची परीक्षा ही लेखी, तोंडी आणि प्रत्यक्षिक अशा तीन टप्प्यात घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी क्रीडा प्रबोधिनीच्या मुख्य प्रशिक्षिका मधुश्री देसाई यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.
कार्यक्रम प्रसंगी क्रीडा प्रबोधिनीच्या सहायक प्रशिक्षिका प्रज्ञा पाटील, पोलिस उपनिरीक्षक वैभव मगधुम, मल्टिफिट बाणेरचे मॅनेजर साईराज शिरगावकर, अतुल गिलचे, शुभम पाबळे, माजी खेळाडू सेक्शन ऑफिसर सदाशिव साळुंके, पोलिस उपनिरीक्षक सुजित काळे, मनीष खवळे, विश्वेष सायकर, भूषण तोरसकर, सोहम कांबळे, अनिकेत देवकर,अंकिता कुमारी. जनार्दन देसाई, स्वप्नील नवले, दयानंद धाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती व तसेच खेळाडूंचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक विकास देसाई, व सहायक प्रशिक्षक स्वाती नवले व पायल गिल्डा यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
विविध बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत नील अबेसन, शर्वी पाटोळे, नेथन मोरे, जियांश संघानी, इरा मोहनपूरकर, अर्ना फुंड, सिया हंडे, निर्वी पाटोळे, सुमेर मेढी, नितीन सुथार, स्मया पवार, विवान काकडे, निलया वाघ, प्रणंजय भोंग, अर्णव अंतुरकर, दर्श पटनाईक, शगुन परमार, अवनिश हुपरे, इवा अंतुरकर, स्पर्श खैरनार, सावी देसाई, संजना संदीप, वीर भार्गव, रेवा भार्गव, अन्वय नायकुडे, पायल गिल्डा, राजेश्री जगताप, प्राजक्ता खैरनार या खेळाडूंनी आपापल्या बेल्ट ग्रेड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.