
मुंबई ः छत्रपती शंभूराजे फ्रेंड्स सर्कलच्यावतीने १२ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान गंगा भाग्योदय सांस्कृतिक हॉल, मेन रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अमेच्यूअर कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी व महिला एकेरी असे दोन गट ठेवण्यात आले असून विजेत्यांना रोख रुपये १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. स्पर्धेत नावे नोंदविण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२५ असून भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जिल्हा कॅरम संघटनेशी संपर्क करावा.