राज्य कुस्ती स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण संघ जाहीर 

  • By admin
  • March 25, 2025
  • 0
  • 68 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः आगामी ६६व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कुस्ती संघ जाहीर करण्यात आला आहे. 

वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत कर्जत-जामखेड (अहिल्यानगर) येथे २६ ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी ग्रामीण विभाग जिल्हा तालिम मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कुस्ती संघाची निवड चाचणी देवगिरी महाविद्यालयात घेण्यात आली. या निवड चाचणीतून ग्रामीण संघ निवडण्यात आला आहे. 

माती विभागात शेख अरबाज शेख सुभान (५७ किलो), नारायण फरकाडे (६१ किलो), कृष्णा दुधारे (६५ किलो), दीपक चोरमले (७० किलो), सोमनाथ चोपडे (७४ किलो), दीपक शिरसाठ (७९ किलो), समर्थ पाटील (८६ किलो), सुभाष ब्राह्मने (९२ किलो), शकील मुसा शेख (९७ किलो), शुभम दांडगे (महाराष्ट्र केसरी ओपन गट) या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

गादी विभागात आर्यन बहुरे (५७ किलो), उदयसिंग बारवाल (६१ किलो), करण बागडे (६५ किलो), राकेश घुनावत (७० किलो), पांडुरंग फरकडे (७४ किलो), नजर जफर पठाण (७९ किलो), इम्रान याकूब पठाण (८६ किलो), धीरजसिंग घुनावत (९२ किलो), दीपक त्रिभुवन (९७ किलो), अनिल राठोड (महाराष्ट्र केसरी गट) या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत स्पर्धा देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते तसेच जिल्हा कुस्ती तालीम संघाचे पदाधिकारी डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, हरिसिंग राजपूत, सचिव प्रा नारायणराव शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. निवड चाचणी स्पर्धा डॉ शेखर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

स्पर्धेत पंच म्ह्णून प्रा सोमनाथ बखळे पाटील, प्रा मंगेश डोंगरे, प्रा हरिदास म्हस्के, विजयसिंग बारवाल, लक्ष्मण चव्हाण, लक्ष्मण जाधव, प्रदीप चव्हाण, गोपाल बम्हनावात, साबेर पटेल मनीष तांदळे आदींनी काम पाहिले.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मधील कुस्ती क्षेत्रातील के डी चोपडे, अजीज शेख नायगाव, रवींद्र काथार, संतोष भांडे, प्रकाश पाटील, रहीम पटेल, किरण खोसे, राजू ढोले, बाबासाहेब थोरात, आवेज खान, इंगळे वस्ताद, कादिर वस्ताद, मच्छिंद्र वर्दे, इक्बाल पटेल, लक्ष्मण जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय देवकर, बाळासाहेब नागे, विनोद शिरभय्ये, हाफिस खान, उमाकांत शिंदे, रौफ शेख, रफिक पठाण, कलीम पठाण, महंमद पठाण, संदीप सौन्दर, रवी शेजवळ, रामचंद्र बागडे, हकीम पटेल, कासम शेख, आबेद पठाण, दत्तू दांडगे, राजू चांदवडे, सुनील काकड, अंकुश राजपूत, ठोंबरे वस्ताद यांच्या वतीने विजयी पैलवानांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *