
नागपूर ः भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या वतीने आयोजित १८ आणि २० वर्षांखालील मुला-मुलींच्या ओपन ४०० मीटर स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात नागपूरची धावपटू कशिश हिने सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन एलएनसीपीई त्रिवेंद्रम येथे सिंथेटिक ट्रॅकवर करण्यात आले आहे. भारतीय अॅथलेटीक्स महासंघाने ठरविलेले पात्रता निकष पूर्ण करू शकणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी संधी मिळालेली होती. कशिशने ४०० मीटर दौडीत सहभागी होत सुवर्णपदक पटकाविले आहे. तिने स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ५६.९२ सेकंद अशी वेळ नोंदविली आहे. रौप्य पदक तामिळनाडूच्या गुनशा व्ही हिने ५७.६२ सेकंद वेळ देत संपादन केले. कांस्यपदक हरियाणाच्या प्राची शर्मा हिने ५८.५२ सेकंदासह प्राप्त केले, अशी माहिती नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ शरद सूर्यवंशी यांनी दिली.
कशिश हिच्या कामगिरीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे यांच्यासह महात्मा गांधी इंग्लिश मीडियम व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र पारशीवणीकर, उपमुख्याध्यापिका दीपाली कोठे, एस जे अंथोनी, उमेश नायडू, शेखर सूर्यवंशी, डॉ संजय चौधरी,अर्चना कोट्टेवार, डॉ विबेकानंद सिंग, रवींद्र टोंग, जितेंद्र घोरदडेकर, हरेंद्र ठाकरे, सुनील कापगते, अमित ठाकूर, वनदेव ठाकरे, डॉ ब्रिजमोहन सिंघ रावत, कमलेश हिंगे, गजानन ठाकरे, हरेंद्र ठाकरे, गौरव मिरासे, निकिता खेरडे, आणि नितीन धाबेकर आदींनी अभिनंदन केले आहे.