
नाशिक ः गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १० वर्षांखालील राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत केंद्रीय विद्यालय नासिक रोड कॅम्प शाळेतील विद्यार्थिनी सानवी सोपान गवळी हिने घवघवीत यश संपादन केले आणि इंडियन राऊङ (धनुर्विद्या) प्रकारात वैयक्तिक सुवर्ण पदक प्राप्त केले.
आर्टिलरी सेंटरचे मार्गदर्शक सुभेदार हरिदास, सुभेदार वकिलराज, टिटोमाश शर्मा, गकुल तामुली यांचे सानवी हिला मार्गदर्शन लाभले आहे. आर्टिलरी सेंटरचे कमांडर ब्रिगेडियर आशिष भारद्वाज, विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य गजराज मीना तसेच विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका कल्पना शिंदे, मुख्याध्यापिका नायर, नाशिक धनुर्विद्या संघटनेच्या सचिव मंगल शिंदे यांनी सानवी गवळी हिच्या सुवर्ण कामगिरीचे कौतुक केले आहे.