
लातूर ः रसिका महाविद्यालयात क्रीडा विभागाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर येथील प्रा संजीवकुमार माने यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ शिवाजी सोनटक्के, क्रीडा विभाग प्रमुख डॉ सचिन चामले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ सुदर्शन पेडगे, डॉ महादेव टेकाळे, डॉ गोपाल सोमानी यांची उपस्थिती होती.
वर्षभरामध्ये आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत, आंतर विभागीय व आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्रीडा बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत भंडे यांनी केले. डॉ शिवाजी सोनटक्के यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.