
माजी क्रिकेटपटू सबा करीम व ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली हस्ते पुरस्कार प्रदान
नागपूर (सतीश भालेराव) ः नागपूर शहरातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहित करणे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बँकर्स स्पोर्ट्स कौन्सिलतर्फे करण्यात येते. असोसिएशनचे यंदाचे ५७ वे वर्ष होते. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व यष्टीरक्षक साबा करीम तसेच ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नागपूर शहर फार चांगले आहे. येथे चांगले खेळाडू जन्मले व घडले सुद्धा. रणजी स्पर्धेतील विजेत्या विदर्भ चमूचे अभिनंदन केले. शरद पाध्ये, प्रशांत वैद्य, राजन नायर, अजय नायडू यासारखे मित्र मला याच शहराने दिल्याचे अभिमानाने ते सांगत होते. पटणा येथे राहणारे सबा करीम यांना त्यांच्या शहरात नेहमी खेळताना नवोदित म्हणून उत्कृष्ट आशवादी पुरस्कार मिळायचे, नागपूर शहरात सिव्हील लाईन्सच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर प्रथम शतक ठोकले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी आपल्या भाषणात आयोजकांनी अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. नागपूर शहराने बरेच मित्र दिल्याचे त्यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण
या सोहळ्यात विविध खेळांतील खेळाडूंना पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आले. त्यात उत्कृष्ट खेळाडू (व्ही. व्ही. नाईक स्मृती पुरस्कार) दिव्या देशमुख (बुद्धिबळ), अमित संपत (क्रीडा पत्रकार, जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार), मंदार महले (२३ वर्षांखालील क्रिकेट, आर. एस. मुंडले स्मृती पुरस्कार), खुशरू पोचा (जी. टी. परांडे स्मृती सेवा पुरस्कार), आंतरबँक पुरस्कार आदित्य गोखले (एसबीआय), शत्रुघ्न गोखले (बास्केटबॉल, बेस्ट ऑर्गनायजर पुरस्कार), शीतल पाणबुडे (बुद्धिबळ, बेस्ट स्मिता ठाकरे (युनियन बँक, निलिमा पारधी स्मृती चषक), अॅड. भानुदास कुळकर्णी (नौशाद अली स्मृती पुरस्कार), ईश्वरी पांडे (जलतरण), उस्मान घनी (क्रिकेट), हरप्रीत रंधावा (हँडबाल), गुंजन मंत्री (बास्केटबॉल), निखिल लोखंडे (कॅरम), प्रणव लोखंडे (बॅडमिंटन), योगेश घारे (उत्कृष्ट गोलंदाज), नितीन रामटेके (व्हॉलिबॉल), आल्हाद गुंजाळ (टेबल टेनिस), राजू कटारे (कॅरम), अनघा मोहरीर (कॅरम) यांचा समावेश आहे. तसेच यावेळी अन्य आंतर-बँक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे पुरस्कार देण्यात आले. त्यात इरा जाधव, अर्णव गुरुंग (संगीत खुर्ची), निरुपमा श्रीरामे, यशमा बोरकर (बास्केटबॉल).
अंताक्षरी स्पर्धा : दिशा आगाशे व अंजु दलाल (प्रथम), नेहा काटकर व हिना चव्हाण (द्वितीय), रुपा शेठ व माधवी बोंडे (उत्तेजनार्थ).
सी रामचंद्र संगीत स्पर्धा : प्रकाश कुळकर्णी तृप्ती गावंडे (उपविजेता) विलास देशकर (विशेष पुरस्कार), रुपा मेश्राम (उत्तेजनार्थ).