< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); राहुल नाईकनवरे एनआयएस सर्टिफिकेट कोर्समध्ये उत्तीर्ण – Sport Splus

राहुल नाईकनवरे एनआयएस सर्टिफिकेट कोर्समध्ये उत्तीर्ण

  • By admin
  • March 27, 2025
  • 0
  • 142 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः भारतीय खेल प्राधिकरण व नेताजी सुभाष राष्ट्रीय खेल संस्था यांच्या अंतर्गत सहा आठवड्यांचा एनआयएस प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स बंगळुरू येथे वर्षातून दोन वेळा घेण्यात येतो. या सर्टिफिकेट कोर्समध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू राहुल नाईकनवरे याने खो-खो खेळाचे प्रशिक्षण पूर्ण केले.

राहुल नाईकनवरे याने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल येथे क्रीडा शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. राहुल नाईकनवरे याने एनआयएस सिक्स विक सर्टिफिकेट कोर्स यशस्वीपणे पूर्ण करून उत्तीर्ण झाल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार गोविंद शर्मा, भाजपा मध्य विधानसभा (गुलमंडी मंडळ) अध्यक्ष सिद्धार्थ साळवे, छत्रपती संभाजीनगर कार्याध्यक्ष बालाजी सगर किल्लारीकर, उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, सचिव विकास सूर्यवंशी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी गौतम निसर्गंध, सहसचिव अभयकुमार नंदन, भारती काकडे, आशिष कान्हेड, विनायक राऊत, भाजपा मध्य विधानसभा (गुलमंडी मंडळ) सरचिटणीस महेश मल्लेकर, यशराज सौदे, उपाध्यक्ष सागर विसपुते, उदय मुळे, मोहन अहिरे, विनायक भवर, मोहन कप्पा, कुणाल पाका, श्रीपाद लोहकरे, शुभम सुरळे, शेखर जाधव, मनोज गायकवाड, प्रमोद गुंड, उमेश साबळे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *