
क्रीडा समन्वयक डॉ ज्योत्स्ना जाधव यांना पुरस्कार प्रदान
शिरपूर ः मुकेशभाई आर पटेल मुला- मुलींची सैनिकी शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या (विज्ञान) क्रीडा समन्वयक डॉ ज्योत्स्ना ईश्वर जाधव यांना ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रीडा क्षेत्रात चांगले काम करत असल्यामुळे कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिरपूर येथे ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १२ महिलांची निवड करून त्यांना सन्मानित करून साजरा केला जातो. महिला दिनाच्या निमित्ताने संस्थेचा वर्धापनदिन कर्तबगार महिलांचा सन्मान करून प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

गेल्या १४ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, प्रशासन, पर्यावरण क्षेत्रात सेवाभाव म्हणून काम करणारी तालुक्यातील कुरखळी येथील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कौटुंबिक व नौकरी तसेच प्रशासकीय जबाबदारी सांभाळून उल्लेखनीय काम करून सेवा देणार्या महिलांना सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संगीताताई देवरे, प्रशिका निकम, वैशाली निकम, डॉ नीता सोनवणे, नीता पाटील, डॉ जया जाणे, क्रांति जाधव, मणिकर्णिका मोरे, भूषण पाटील, ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर मोरे, कार्याध्यक्ष मनोहर वाघ, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव नेहा मोरे, खजिनदार मुरलीधर मोरे, सदस्य वर्षा पाटील, सदस्य दुर्गेश मोरे, हेमकांत मोरे, चंद्रकांत मोरे, मनीषा मोरे, सिंधु पाटील, वैशाली वाघ, निर्मला वाघ, मनीषा पाटील, निर्मला शिरसाठ, अनिता पाटील, सीमा पाटील, सोनल मोरे, शुभांगी मोरे, पुष्पा मोरे, सुनंदा मोरे, कल्पना मोरे, मोनाली पाटील, कविता गावित, दत्तू गावित, नरेश मोरे, जितेंद्र मोरे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी हॉटेल साई स्वादचे संचालक अरविंद राजपूत व कर्मचारी तसेच बातमी कट्टाचे संपादक अमोल राजपूत यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष अमरीशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्था उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शालेय संचालक गिरिजा मोहन, संस्थेचे इतर मान्यवर तसेच शाळेचे प्राचार्य दिनेशकुमार राणा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.