
क्रीडा शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महासंघ प्रयत्नशिल ः शरदचंद्र धारुरकर
जळगाव ः महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ शाखा जळगाव द्वारे जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा ग स सोसायटी सभागृह जळगाव या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, महासंघाचे उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर, जी एस सोसायटीचे अध्यक्ष अजब सिंग पाटील, पुणे शहराध्यक्ष दिलीप धमाले, राज्याचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, पुणे विभागीय अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, नाशिक विभागीय सचिव तथा जिल्हा सचिव अजय देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष डॉ संजय निकम, अमरावती विभागीय प्रमुख जयदीप सोनखासकर, बी एन पाटील, राजू कुलकर्णी, दिलीप पानपाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
राज्य सरकारकडून गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार रद्द झाल्याने आपल्या क्रीडा सहकाऱ्यांचा कार्याचा गुणगौरव व्हावा या हेतूने प्रत्येक तालुक्यातील क्रीडा शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. त्यात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक डॉ. विलास नारखेडे व सिद्धेश्वर वाघुळदे, संचालक जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गुणवंत क्रीडा पुरस्कार नगीनदास उखा बागुल, दत्तात्रेय मुरलीधर फेगडे, रवींद्र सुभाष पाटील, संदीप हिरामण पवार, विलास सुकलाल पाटील, धैर्यशील प्रताप सिंग राजपूत, वंदना वासुदेव ठोके, योगेश पंडित शिंदे, रमेश शंकर जावळे, अनिल माकडे, अनिल शामराव पाटील इत्यादी क्रीडा शिक्षकांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ प्रदीप साखरे यांनी केले व महासंघाने केलेल्या कार्याची माहिती सांगितली. विविध आंदोलनाने क्रीडा शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागलेत. जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ रवींद्र नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना क्रीडा शिक्षकांच्या असलेल्या समस्या व विविध स्पर्धांकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर क्रीडा शिक्षक हा शाळेचा एक महत्त्वाचा घटक मानला जात असतो. त्यामुळे सन्मान होणे काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांनी आपल्या मनोगतातून महासंघाच्या कार्याची माहिती देऊन क्रीडा शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. तसेच येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी यांनी केले. डॉ संजय निकम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी एन पाटील, राजू कुलकर्णी, गुलाब पाटील, युवराज भोसले, पी पी पाटील ,राहुल साळुंखे, शितोळे, नरेंद्र म्हस्के, एस टी चौधरी, मनोज वारके, ज्ञानदेव धांडे, भूषण भोई, गिरीश खोडके, अजय बोरणारे, ललित बढे, संतोष पाटील, हरी राऊत, पुनम कोल्हे, के टी चौधरी, जफर शेख अझर अली, अझर खान यांच्यासह संघटनेच्या तालुका व जिल्हा पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. पुरस्कार कार्यक्रमात राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व महासंघाच्या कार्याबद्दलचा आढावा व महासंघाने केलेले कार्याबद्दलची सविस्तर माहिती अध्यक्षांनी दिली.