
सुहानी कहांडळची धमाकेदार अर्धशतकी खेळी
अहमदाबाद ः पश्चिम विभागीय अंडर १७ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने मुंबई महिला संघावर सात विकेट राखून मोठा विजय संपादन केला. सुहानी कहांडळ हिने सामनावीर पुरस्कार पटकावला.
गुजरात कॉलेज क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. मुंबई महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदीज स्वीकारत ४० षटकात नऊ बाद १५२ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना महाराष्ट्र महिला संघाने २६ षटकात तीन बाद १५५ धावा फटकावत सात विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

या सामन्यात सुहानी कहांडळ हिने धमाकेदार फलंदाजी केली. सुहानी हिने ७९ चेंडूत ८८ धावांची दमदार खेळी केली. तिने १४ चौकार मारले. तनिषा शर्मा हिने ५१ चेंडूत ४१ धावा फटकावल्या. तिने सात चौकार मारले. भाविका अहिरे हिने पाच चौकारांसह ३९ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत जान्हवी वीरकर हिने २० धावांत तीन विकेट घेतल्या. गायत्री सुरवसे हिने १३ धावांत दोन गडी टिपले. त्रिशा परमार हिने ४० धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई महिला संघ ः ४० षटकात नऊ बाद १५२ (इरा ३६, तनिषा शर्मा ४१, हिया पंडित १५, श्रावणी पाटील नाबाद २९, कृतिका यादव १२, जान्हवी वीरकर ३-२०, गायत्री सुरवसे २-१३, रोशनी पारधी १-३६, ईश्वरी आवासरे १-२५) पराभूत विरुद्ध महाराष्ट्र महिला संघ ः २६ षटकात तीन बाद १५५ (ईश्वरी आवासरे १३, सुहानी कहांडळ ८८, भाविका अहिरे ३९, सह्याद्री कदम नाबाद ८, मयुरी थोरात नाबाद ०, त्रिशा परमार २-४०, हिया पंडित १-१०). सामनावीर ः सुहानी कहांडळ.