
नंदुरबार येथील सुषमा शाह, नूतनवर्षा वळवी, जगदीश पाटील, युवराज पाटील यांचा होणार सन्मान
नंदुरबार ः नाशिक विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी नंदुरबार येथील जगदीश पाटील व युवराज पाटील तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी येथील मुख्याध्यापक सुषमा शाह व नूतनवर्षा वळवी यांची निवड करण्यात आली आहे.

जळगाव येथे येत्या रविवारी (६ एप्रिल) पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्यावतीने यावर्षी नाशिक विभागातील आदर्श क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीपासून विभागातील त्या-त्या जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रास सतत सहकार्य करणारे व योगदान देणारे मुख्याध्यापक यांनाही या पुरस्कारात समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जळगाव जिल्ह्यास मिळाले आहे.

पुरस्कार विजेत्यांमध्ये नाशिक-आदर्श मुख्याध्यापक संजय चव्हाण (जुहरमल सरूपचंद रुंगठा हायस्कूल, अशोकस्तंभ, नाशिक), क्रीडा शिक्षक किशोर राजगुरू (लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक), राजाराम पोटे (मराठा हायस्कूल, शिवाजीनगर, नाशिक), धुळे मुख्याध्यापक संजय पवार (राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, धुळे), फादर जॉय व्हेटोली सी एम आय (चावरा हायस्कूल, धुळे), क्रीडा शिक्षक डॉ भूपेंद्र मालपुरे (जे आर सिटी व डी एम बारी कनिष्ठ महाविद्यालय, धुळे), विजय एकनाथ सिसोदे (एच आर पटेल कन्या व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरपूर, धुळे), जळगाव मुख्याध्यापक लक्ष्मण तायडे (भाऊसाहेब राऊत विद्यालय, जळगाव), चंद्रशेखर पाटील (बी यू एन रायसोनी विद्यालय, जळगाव), क्रीडा शिक्षक निलेश पाटील (जयदुर्गा माध्यमिक विद्यालय, मेहरून), योगेश सोनवणे (बी यू एन रायसोनी विद्यालय, जळगाव), प्रवीण पाटील (खुबचंद सागरमल विद्यालय, जळगाव), नंदुरबार-मुख्याध्यापक सुषमा शाह (श्रॉफ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नंदुरबार), नूतनवर्षा वळवी (एस ए मिशन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नंदुरबार), क्रीडा शिक्षक युवराज पाटील (कुबेर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद), जगदीश बच्छाव (डी आर हायस्कूल, नंदुरबार) यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

विभागीय पुरस्कार निवड समितीत प्रशांत कोल्हे (विभागीय अध्यक्ष, जळगाव), डॉ आनंद पवार (विभागीय सचिव, धुळे), संजय पाटील (नाशिक), सुनील सूर्यवंशी (नंदुरबार) यांचा समावेश आहे. हा पुरस्कार सोहळा विभागातील गुणवंत क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या अथक परिश्रमांना दिलेली आदरांजली आहे. या सोहळ्यात सर्व मान्यवर, क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.