
छत्रपती संभाजीनगर : वेगवेगळ्या सायकल क्लबमधून नियमित सायकलिंग करणारे सायकलपटू दरवर्षी सायकल वारी करत असतात. यंदाही चौथी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी आयोजित करण्यात येणार आहे. लातूर सायकलिंग क्लबकडे यजमानपद सोपवण्यात आले आहे.
या संदर्भात विविध सायकल क्लबची पहिली बैठक शनिवारी घेण्यात आली. या बैठकीला ५० सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लातूर सायकलिंग क्लबकडे यजमानपद सोपवण्यात आले आहे. संमेलन स्थळ, भोजन व्यवस्था मनमाडकर मंडप व डेकोरेटर्स यांच्या जागेत करण्यात येणार आहे. पंढरपूर स्टेशन समोरील रेल्वे ग्राऊंड येथे सायकल रिंगण होईल. या प्रसंगी प्रमुख अतिथी अमित समर्थ, सर्व क्लबचे अध्यक्ष, विशेष पुरस्कारार्थी यांना स्मृतिचिन्ह यजमान लातूर सायकलिंग क्लबतर्फे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
निवास व्यवस्था प्रत्येक क्लबने आपापली करायची आहे. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण सुरू होणार आहे. यावर अद्यावत माहिती दिली जाईल. २०२५ ची आषाढी एकादशी २५ जुलै, शनिवारी आहे. तेव्हा आपली वारी व संमेलनाची तारीख १२ जुलै, रविवारी असावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. शेवटी पंढरपूर सायकलर्स क्लबतर्फे सर्वांसाठी स्वादिष्ट प्रीतीभोज आयोजित करण्यात आले होते. त्याचा स्वाद सर्वांनी घेतला व सभेची सांगता झाली. सभेसाठी आलेले क्लब व सदस्य नाशिक (४), मालेगाव (३), बुलढाणा (४), डोंबिवली (४), छत्रपती संभाजीनगर तेजस्विनी ग्रुप (१), सांगली एस ३ (४), लातूर (५), फलटण (१), बारामती (३), कुर्डुवाडी (२), श्रीरामपूर (६), पंढरपूर (१३) आदी उपस्थित होते.