
येत्या रविवारी आयोजन
जालना : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असून त्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनातर्फे १५ वर्षांखालील मुलींची जिल्हा संघ निवड चाचणी रविवारी (१३ एप्रिल) सकाळी १० वाजता साई काणे अकॅडमी अॅस्ट्रो टर्फ, एमआरडीए स्कूल जवळ, रोहन वाडी रोड जालना येथे घेण्यात येणार आहे.
या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २०१० या तारखेनंतर जन्मलेल्या मुलींना सहभागी होता येणार आहे. इच्छुक मुलींनी साई काणे क्रिकेट अकॅडमीच्या अॅस्ट्रो टर्फ एमआरडीए स्कूल जवळ रोहनवाडी रोड जालना येथे १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे.
या निवड चाचणीसाठी उपस्थित असणाऱ्या मुलींना जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, टीसी, दहावीची सनदच्या सत्यप्रती सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाचे अध्यक्ष अॅड नरेंद्र देशपांडे, राजू काणे, अभिजीत चव्हाण इत्यादी सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
या निवड चाचणीतून निवड झालेल्या मुलींना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धेत जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल सर्व खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात स्वतःचे क्रिकेट साहित्य सर्व उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9823373361 आणि 9922933138 या क्रमांकावर संपर्क साधावा.