
सोलापूर ः भारतीय शालेय क्रीडा महासंघ मान्यताप्राप्त भारतीय फुटबॉल टेनिस महासंघाच्या महासचिवपदी महाराष्ट्र फुटबॉल टेनिस असोसिएशनचे सचिव भीमराव बाळगे यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राम अवतार यांनी ही माहिती दिली आहे.
भीमराव बाळगे यांनी मार्शल आर्टच्या माध्यमातून व फुटबॉल टेनिस, रग्बी या खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी निर्माण करून दिली आहे. बाळगे हे अनेक खेळाच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय संघटनेवरती विविध पदावरती काम करत असून शालेय व संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेतून अनेक खेळाडूंना त्यांनी घडवले आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध खेळांच्या शालेय व संघटनेच्या अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात शालेय स्पर्धेत फुटबॉल टेनिस या खेळाचा समावेश करण्यासाठी भीमराव बाळगे यांनी परिश्रम घेतले आहेत.