
पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे क्रीडा अधिकारीपदी शाम राजाराम भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक व प्राथमिक ३२ शाळा, माध्यमिक व भागशाळा ५६, उच्च माध्यमिक ३२ शाळा, व्यवसाय अभ्यासक्रम २३, वरिष्ठ महाविद्यालय १९ अशा एकूण १६२ विद्याशाखा आहेत. संस्थेची शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार, संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मण पवार, सहसचिव आत्माराम जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये शालेय गुणवत्तेबरोबर क्रीडा विषयक आवड निर्माण व्हावी यासाठी क्रीडा विषयक उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आजतागायत शाळेतील क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय ६२१, राष्ट्रीय २८३, आंतरराष्ट्रीय ५७ असे एकूण ९६१ खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त केलेले आहे.
पुढील काळात क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक प्रगती व्हावी यासाठी संस्थेच्या क्रीडा अधिकारी पदावर शाम राजाराम भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल शाम भोसले यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.