
छत्रपती संभाजीनगर ः भारतीय मैदानी खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन व स्पर्श क्रीडा मंडळ यांच्या वतीने उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचे निशुल्क आयोजन करण्यात आले आहे.
उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिर हे शालेय मुले व मुली या दोन्ही गटात होईल वयोगट १० वर्ष ते २० वर्षे या वयोगटात होणार आहे, प्रशिक्षण शिबीर हे १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत जिल्हा परिषद मैदान, गणपती विसर्जन विहीर, औरंगपुरा येथे सकाळी सात ते नऊ तसेच सायंकाळी पाच ते सात या वेळात होईल. अधिक माहिती करिता श्रीपाद लोहकरे (९०९६६२५९११), राहुल नाईकनवरे (९५२७८८३५४६), वरद कचरे (८४२१५६६२९९) यांच्याशी संपर्क साधावा.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळेतील व महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार गोविंद शर्मा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन कार्याध्यक्ष बालाजी सागर किल्लारीकर, उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव भारती काकडे, अभयकुमार नंदन, विनायक राऊत, आशिष कान्हेड, शुभम सुरळे यांनी केले आहे.