नंदुरबार ः पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनियर गट (मुले, मुली, पुरुष, महिला) लॅक्रोस स्पर्धेसाठी गुरुवारी (१० एप्रिल) नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लॅक्रोस असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा लॅक्रोस असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब-ज्युनिअर, ज्युनिअर आणि सीनियर गट (मुले, मुली, पुरुष, महिला) यांच्यासाठी पुणे येथे लॅक्रोस स्पर्धा १४ व १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा लॅक्रोस असोसिएशनचा संघ सहभाग नोंदविणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन १० एप्रिल २०२५ गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले आहे.
लॅक्रोस हा नव्याने ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट झालेला खेळ असून या निवड चाचणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक आणि कुशल क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा लॅक्रोस असोसिएशनचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, डॉ मयुर ठाकरे, मीनलकुमार वळवी आणि सचिव भरत चौधरी, रुपेश महाजन यांनी केले आहे.