
मुंबई ः दिल्ली येथे झालेल्या तिसऱया अस्मिता खेलो इंडिया सब ज्युनियर महिला हॉकी लीग स्पर्धेत एसएआय संघाने विजेतेपद पटकावले. एसएआय एनसीओई मुंबई येथील हॉकी खेळाडू पुष्पा डांग हिने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी बजावली.
या स्पर्धेत पुष्पा डांग हिने एक भक्कम बचावपटू म्हणून शानदार खेळ केला. तिने प्रत्येक आक्रमण रोखून धरले आणि संघाच्या विजेतेपदाच्या शर्यतीत महत्त्वाची भूमिका बजावली. या लक्षवेधक कामगिरीबद्दल एसएआय एनसीओई मुंबई केंद्राचे संचालक पांडुरंग चाटे यांनी पुष्पा डांग हिचे अभिनंदन केले आहे.